Saturday, June 27, 2009

लमान तांड्यावरील युवती अभ्यासासाठी लंग्झबर्गकडे

सकाळ वृत्तसेवा:

लातूर - लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील लमान तांड्यावर राहणाऱ्या बबिता राठोड व तळणी येथील मागासवर्गीय कुटुंबातील शोभा सुरवसे या दोन युवती लग्झंबर्गला रवाना झाल्या आहेत. त्या तेथील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणार आहेत. नारी प्रबोधन मंचमुळे त्यांना ही परदेशात जाण्याची संधी मिळत आहे.
नारी प्रबोधन मंचच्या वतीने लातूर व औसा तालुक्‍यात 35 गावांतून महिला, युवक युवती व बालकामगार या घटकांसोबत कार्य केले जात आहे. यात गावपातळीवर स्थापन झालेल्या युवती गटातील नांदुर्गाच्या बबिता राठोड व तळणीच्या शोभा सुरवसे या दोन मुलींना जर्मनीजवळ असलेल्या लग्झंबर्गला जाण्याची संधी मिळाली आहे. तेथील सामाजिक परिस्थितीचा त्या अभ्यास करणार आहेत. "तेरे डेस होम्स्‌ व एइआय लग्झंबर्ग या संस्थांच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे. याकरिता राज्यात कार्यरत असलेल्या संस्था प्रतिनिधींच्या गटातून अनेक युवतींना एकत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी गावपातळीवर युवती मंडळाच्या माध्यमातून केलेले कार्य, या मुलींतील धाडस पाहून 36 मुलींची निवड करण्यात आली. लोकशाही पद्धतीने निवडणूूक घेऊन नंतर या दोघींची निवड झाली. एक मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेली व दुसरी लमानतांड्यावर वाढलेल्या या मुलींनी परदेशात जाण्याच स्वप्नही पाहिले नव्हते. त्यांना मंचच्या कार्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे मंचच्या अध्यक्षा सुमती जगताप, हेमलता वैद्य, राधाकृष्ण देशमुख यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.