दलित, भटक्या विमुक्त, आदिवासी या समाजातील दूर्लक्षित लोकांच्या प्रगतीकरीता कोणतीही अभिलाषा न बाळगता काम करणाऱ्यांची संख्या आजमितीला कमी आहे. अशा स्थितीत भटक्या विमुक्त समाजातील लोकांकरीता, त्यांच्या कल्याणाकरीता अहोरात्र काम करणारे वाशिम जिल्ह्यातील शंकर नरसिंग आडे यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. त्यांच्याविषयी सांगताहेत गिरीराज सावंत
गेल्या ५० वर्षांत राज्याच्या सामाजिक क्षेत्रात अनेक स्थितंतरे झाली. दलित , आदिवासी समाजात जरी पूर्ण नसला तरी काही प्रमाणात त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल घडला आहे. परंतु भटक्या-विमुक्त समाजातील अनेक जाती-जमाती आजही समाजाच्या मुळ प्रवाहापासून दूर आहेत. आजही या समाजातील लोकांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागते आणि मिळेल त्या जागेवर तात्पुरती झोपडी उभारुन रहावे लागते. त्यांना समाजात
आजही सन्मानाने वागणूक दिली जात नाही. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन व प्रा.मोतीराम राठोड यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद पत्रकाराची नोकरी सोडून शंकर आडे यांनी भटक्या-विमुक्त समाजातील लोकांच्या समस्या दूर करण्याकरीता पूर्णवेळ कार्यकर्ता काम सुरु केले.साधारणत: १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती संघ या संघटनेच्या माध्यमातून आडे यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. वैदू, पारधी, तोडीया, भाट, बहुरुपी, डोंबारीण, माकडवाले, अस्वलाचे खेळ करणारे सारख्या अनेक जाती जमातींना रेशन कार्ड आणि मतदानाचा हक्क मिळावा या करीता राज्यातील विविध जिल्ह्यात आणि मंत्रालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजातील लोकांना या फिरते रेशन कार्ड मिळाले व तसेच मतदानाच्या यादीतही त्यांचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. देश स्वतंत्र झाल्यापासून राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना देशाचे नागरीकत्व असूनही कधी मतदान करण्याची संधी मिळाली नव्हती . मात्र आम्ही केलेल्या आंदोलनामुळे ही संधी मिळाल्याची माहीती आडे यांनी दिली.तसेच या समाजातील लोकांना बचतीची सवय लागावी याकरीता बँकेत खाती खोलून देण्यात आली. त्याकरीताही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेसमोर आंदोलन करावे लागले. या बँकेत मुंबई शहरातील सुमारे ५०० महिलांना संघटनेच्यावतीने अल्पबचत खाती उघडून देण्यात आली असून आणखी दहा हजार महिलांना खाती उघडून देणार येणार असल्याची माहिती शंकर आडे यांनी दिली. ब्रिटीश काळापासून पारधी समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून संबोधण्यात येते. तो शिक्का पुसून काढण्याकरीता या समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सुरु आहेत. तसेच या समाजातील सुमारे दोन हजार निष्पाप नागरीकांना पोलिसांकडून सहा महिन्याहुन अधिककाळ विनाकारण तुंरुगात डांबलेले आहे अशा कैद्यांची माहिती गोळा करुन त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात येत आहे. या संदर्भात मानवी हक्क आयोगाकडे व राज्य शासनाकडे तक्रार नोंदविण्यात आली असून त्यांना लवकरात मुक्त करण्यात यावेत याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे.या समाजाला मागील ४०-४५ वर्षांत रहिवासी दाखले , जातीचे दाखले शासनाकडून दिले जात नव्हते. मात्र संघटनेच्या आंदोलनामुळे २००७ सालापासून भटक्या विमुक्तांना रहिवासी व जातीचे दाखले,रेशन कार्ड देण्याचे आदेश राज्य शासनाला द्यावे लागले. त्यामुळे राज्यातील या समाजाला हे दाखले व रेशन कार्ड मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.हे सर्व यश एका दिवसात अथवा एका वर्षांत मिळाले नसल्याचे सांगून त्याकरीता मागील १ ५ वर्षांपासून प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच याकरीता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन सर्वाना एकत्रित आणणे त्यांना संघटनेचे सभासद बनविणे आणि त्यांच्या न्याय हक्काकरीता आंदोलन उभा करणे आदी कामे शंकर आडे हे करत असून याकरीता कोणाकडून जबरदस्तीने अथवा धाक दपटशा दाखवून पैसा गोळा न करता तो एकतर स्वखर्चातून अथवा समाजातील लोकांनी स्वखूशीने दिलेल्या पैशांवर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रायगड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नांदेड, िहगोली, वाशीम, यवतमाळ, नागपूर, अकोला, बुलढाणा, जळगाव, जालना, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत संघटनेचे काम सुरु आहे.

No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.