बीड - गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित आणि बंजारा समाज परिवर्तन अभियानचे प्रांत संयोजक, जिल्हा परिषद सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने रानमळा-भाटेपुरी या गट ग्रामपंचायतचा कारभार सांभाळण्याचा मान बंजारा समाजातील महिलेला मिळाला आहे.या ग्रामपंचायतचे सरपंचपद भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे, त्यामुळेदेखील या महिलेला संधी मिळाली आहे. रानमळा-भाटेपुरी (ता. गेवराई) या गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बंजारा समाजातील पारूबाई बळिराम चव्हाण यांची निवड झाली आहे. येथील सरपंच श्रीमती पांचाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नव्याने ही निवड करण्यात आली. उपसरपंचपदी संगीता आडाळे यांची निवड करण्यात आली आहे. या सोबतच गेवराई तालुक्यात आतापर्यंत पाचेगाव तांडा, लोणाळातांडा, अंतरवाली तांडा ग्रामपंचायतींचे सरपंचपदही बंजारा समाजाकडेच आहे. रानमळा-भाटेपुरी सरपंचपदी पारूबाई बळिराम चव्हाण यांची निवड करण्यासाठी जयभवानी कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, झुंबर निकम, प्रा. भाऊसाहेब आडाळे, प्रा. राजाभाऊ चव्हाण, पांडुरंग निकम, आसाराम मुळूक, ग्रामपंचायत सदस्य अंकुश जाधव, दिगंबर आडाळे, प्रल्हाद हिंगे, सखाराम मुळूक, पांडुरंग मुळूक, अंबादास चव्हाण, श्रीराम चव्हाण आदींनी प्रयत्न केले.
Headline
Tuesday, May 26, 2009
रानमळ्याचा कारभार बंजारा महिलेच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा

Hand Paintings
Gormati Headline Animator
Badshah Naik

No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.