सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit

Headline

Monday, October 26, 2009

कंधार तालुक्‍यातील तांडावासीयांचा मतदानावर बहिष्कार


सकाळ वृत्तसेवा
कंधार - देश स्वतंत्र होऊन साठ वर्षे उलटून गेली; परंतु अद्याप बंजारा समाजाच्या समस्या आहेत तशाच आहेत. आधारभूत सुविधांपासून ते वंचित आहेत. रस्ते, पाणी आणि आरोग्याचा प्रश्‍न आजही त्यांना भेडसावत आहे. या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी कंधार तालुक्‍यातील तांडावासीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे निवेदन पाच तांड्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की तालुक्‍यातील ढाकूतांडा, रामातांडा, रोहिदासतांडा, गणातांडा व हिरामण तांडा येथील ग्रामस्थांना चालण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही. पाण्याची व्यवस्था नसल्याने माणसांसह जनावरांचे हाल होत आहेत. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे जीवन नरक बनले आहे. स्वातंत्र्याची साठी उलटल्यानंतरही बंजारा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. सध्या पंधराव्या लोकसभेची निवडणूक होत आहे. यापूर्वी 14 खासदार झाले; परंतु एकही तांड्याकडे फिरकला नाही. हे बंजारा समाजाचे दुर्दैव आहे. साठ वर्षांत प्रश्‍न सुटले नसतील तर मतदान करावे कशाला, असा प्रश्‍नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
वीज, रस्ते, पाणी आणि निवाऱ्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी घेतली. दिवसामागून दिवस जात आहेत. महिने, वर्ष उलटत आहेत. बंजारा समाजाच्या समस्याही वाढल्या आहेत. नरक यातनांची मालिका बंजारा बांधव सहन करत आहेत. या सर्वांचा निषेध म्हणून ढाकूतांडा, रामातांडा, रोहिदास तांडा, गणातांडा, हिरामण तांडा येथील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे पुढे म्हटले आहे. निवेदनात असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik