सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Tuesday, October 13, 2009

बंजारा समाजाची चित्तरकथा लवकरच ग्रंथबद्ध


सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 29th, 2009 AT 11:08 PM

बंजारा समाजातील महिला. (संग्रहित छायाचित्र)

मुंबई - राजकीय पटलावर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणारा बंजारा समाज आता शब्दरूपाने आपल्या समाजाची चित्तरकथा मांडणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंजारा समाजास अधिकाधिक प्राधान्य मिळावे म्हणून धडपडणारा बंजारा संघ आपल्या समाज संस्कृतीचा दस्तावेज ग्रंथरूपाने लवकरच प्रकाशित करणार आहे.
या समाजाची पाळेमुळे, त्याची संस्कृती, श्रद्धा-अंधश्रद्धा, रीतीरिवाज, गोत्र या साऱ्याचा शोध घेत-घेत समाजाने केलेल्या प्रगतीचा धांडोळाही या अभ्यासग्रंथातून घेतला जाणार आहे. राज्यात बंजारा समाजाची दीड कोटी लोकसंख्या आहे. आजूबाजूचे जग, समाजव्यवस्था, कुटुंबपद्धती वेगाने बदलत गेली; तरीही गावागावांमध्ये असणारी या समाजाची तांडासमूहपद्धती मात्र आजही कायम आहे. गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी नायक आणि कारभाऱ्याच्या नेतृत्वाखाली आपले रोटी-बेटीचे व्यवहार सांभाळणाऱ्या या समाजाने आजही गावागावांतून आपली तांडा संस्कृती जपली आहे. या तांड्यामधील परस्पर नातेसंबंध, त्यांचे संघर्षमय जीवन, त्यातील यशोगाथांचे सुरस वर्णनही या अभ्यासग्रंथात वाचायला मिळणार आहे. अकरा तज्ज्ञ अभ्यासकांच्या मदतीने बंजारा समाजातील या शोधयात्रेचा प्रारंभ केला जाणार असल्याचे 'तांडा वस्ती सुधार योजने'चे संचालक हिरालाल राठोड यांनी 'सकाळ'ला सांगितले. या समाजाचे पूर्वज राजस्थानमधील मेवाडमधील राजा सेशूदिया कुळ हे बंजारा समाजाचे कुळ मानले जाते. या समाजातील साऱ्या प्रथा-परंपरा आजही राजस्थानमधील समूहरीतीप्रमाणेच आहेत. नायकाच्या साक्षीने तांड्यामध्ये सुरू असणारे विवाहसोहळे एक-एक महिना चालतात. दिवाळीला सर्वत्र धुमधडाक्‍यात केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाची परंपरा बंजारा समाजामध्ये नसते, तर तेथे 'काळी दीपावली' जल्लोषात साजरी केली जाते. वेदमंत्रांच्या घोषात विविध सणसमारंभ इतर समूहात साजरे केले जातात; मात्र बंजारा समाजामध्ये गप्पीच्या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकही शब्द न उच्चारता मौनाचे महत्त्व सांगणारी ही अनोखी प्रथा आजही हा समाज पाळतो.
समाज- संस्कृतीच्या या विविध अंगांचा शोध घेत असतानाच बंजारा समाजासाठी शासनपातळीवर राबविण्यात आलेल्या विविध योजनांचाही परामर्श यात घेतला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik