सकाळ वृत्तसेवा
Tags: akola, conference, makhram pawar
अकोला - राज्यात 80 लाखांवर संख्या असलेल्या बंजारा समाजावर कॉंग्रेसकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान न करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बंजारा समाजाचे नेते तथा माजी मंत्री मखराम पवार यांनी दिली.
आज (ता. सहा) बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव परभणी कृषी विद्यापीठास देण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. सन 1962 पासून बंजारा समाजाला मिळत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या सवलती राज्य शासनाने बंद केल्या. राज्य शासनाने अनेक सवलती बंद करून समाजासाठी शिक्षण व नोकरीचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावेळी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही बंजारा समाजाला कॉंग्रेसने एकाही मतदारसंघात उमेदवारी दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
वारंवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंजारा समाज संघटित झाला असून, नांदेड व औरंगाबाद येथे समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेसला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, भाजपने एका मतदारसंघात बंजारा व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. याबाबतही नाराजी आहेच. पण, नेहमी कॉंग्रेससोबत असलेल्या समाजाला डावलण्यात आल्याने कॉंग्रेसवर समाजाचा रोष अधिक आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गणपत राठोड, उल्हास जाधव आदी उपस्थित होते

No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.