डोंबिवली/प्रतिनिधी - बंजारा समाज विकासाचे मोठे कार्य माजी मंत्री वसंतराव नाईक यांनी केले. जो आपल्या बोलीभाषेतून बोलतो तो बंजारा, असे सांगत अन्न व औषध विभागाचे मंत्री मनोहर नाईक
यांनी बंजारा समाजाच्या गोरमाटी भाषेतून भाषण केले. अखिल भारतीय बंजारा समाजाचा दोन दिवसांचा उत्सव ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित केला होता. यावेळी उपसभापती वसंत डावखरे, आयुक्त गोविंद राठोड, मोरसिंग राठोड, नगरसेवक नितीन पाटील, शिवाजी शेलार, शंकर पवार, बाळा म्हात्रे उपस्थित होते. बंजारा समाजाची डोंबिवलीत वास्तू होण्यासाठी आयुक्त राठोड यांनी एखादा प्लॉट या संस्थेला उपलब्ध करून द्यावा, डावखरे यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहू शकते. पण तत्पूर्वी डावखरे यांना बळ द्या तुम्हाला ते शक्ती देतील, असा प्रचारही यावेळी नाईक यांच्याकडून करण्यात आला. बंजारा समाज हा दगड फोडण्याचे काम करतो. दगड फोडण्यासाठी त्याच्याजवळ जी शक्ती आहे ती शक्ती कोणालाही भेदू शकते. पण बंजारा समाज संघटित नसल्याने हा समाज भरडला जात आहे. प्रत्येक गोष्ट पैशाने होत नसते. हा समाज मोठय़ा प्रमाणावर संघटित होता. त्यासाठी निधीची गरज पडली नाही म्हणून विचाराने एक होण्याची गरज असल्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. शिधावाटप पत्रिका तयार करताना येणाऱ्या अडचणी, नोकरी, व्यवसायातील लाभ मिळून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. देशात ७ कोटी बंजारा समाज आहे. दोनशे तांडे व्यवसायासाठी देशभर फिरतात. अडीच लाख लोक भटकत असतात. तीन लाख घरात वास्तव्य करून असतात. बंजारा समाज हा आंतरराष्ट्रीय मजूर होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
refrence,
loksatta
No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.