बीड, २५ जुलै/वार्ताहरगेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांना बंजारा समाज मित्र तर विभागीय समाजकल्याण अधिकारी रा. उ. राठोड यांना बंजारा समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी होणार असल्याची माहिती बंजारा क्रमचारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष पी. टी. चव्हाण यांनी दिली. बीड जिल्ह्य़ातील गेवराई येथे मागील दहा वर्षांपासून कर्मचारी सेवा संस्था व जयंती उत्सव समितीच्या वतीने बंजारा समाजाचा निर्धार मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलैला घेण्यात येतो. या वर्षी या मेळाव्यात बंजारा समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यात आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणारे आमदार अमरसिंह पंडित यांना बंजारा समाज मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर औरंगाबाद विभागाचे समाजकल्याण अधिकारी रा. उ. राठोड यांना बंजारा समाज भूषण पुरस्कार दिला जाणार आहे.
refrence,
loksatta
1 comment:
hey sacha me bhut accha ha
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.