Headline
Tuesday, August 25, 2009
क्रीमी लेअर दाखल्याविरोधात आंदोलन
मुंबई टाइम्स टीम, पालघर केंद आणि महाराष्ट्रातील काँग्रेस सरकार लोकांच्या मागण्यांच्या आड येत असल्याने आम्हाला मागण्या मान्य करून घेण्यासाठी रास्ता रोकोसारखं आंदोलन करणं काँग्रेस भाग पाडत आहे, असा आरोप भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी भटक्या विमुक्तांच्या मागण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातल्या बोईसर इथे रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी बोलताना केला. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्ताना क्रिमिलेअरच्या सक्तीच्या दाखल्यातून वगळण्यात यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन करण्यात येत असून बोईसर इथे रेल्वे स्टेशनबाहेर आज स्मृती इराणी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षा अर्चना वाणी, माजी जिल्हा उपाध्यक्ष लाला बाजपेई, माजी जिल्हा अध्यक्ष मनीषा चौधरी, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील आदींच्या नेतृत्वा- खाली रास्ता रोको करण्यात आलं. भटक्या विमुक्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी अनेक वेळा धनगर समाज उन्नती मंडळ, बंजारा क्रांतीदल, भगवान सेना, वडार समाज महासंघ भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने अर्ज विनंत्या करण्यात आल्या, मात्र कुंभकर्णाची झोप घेतलेला काँग्रेस सरकारला जागे करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात आल्याचं स्मृती इराणी यांनी भाषणात सांगितलं. माजी जिल्हा अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. 'अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती याआधीच आथिर्क दृष्ट्या गांजलेल्या आहेत. त्यांना क्रिमिलेअर दाखल्यासाठी तहसील कार्यालयात जाण्या- येण्यासाठी तसंच कागद पत्रांच्या जमवा-जमवीसाठी मोठा खर्च होतो. इतकंच नव्हे तर हा दाखला मिळवण्यासाठी कामधंदा, मोलमजुरी सोडून सात-आठ दिवस खचीर् घालवावे लागतात. असा दाखला रद्द केल्यास या समाजाला दिलासा मिळेल.' असं भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अर्चना वाणी यांनी सांगितलं. लाला बाजपेई यांनी क्रिमिलेअर दाखला जर रद्द केला नाही, तर उग्र आंदोलनाशिवाय जनतेला पर्याय नसून काँग्रेस सरकारने शहाणपण दाखवून दाखला रद्द करावा अशी मागणी केली
No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.