सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Tuesday, October 13, 2009

स्वातंत्र्याची पहाट बंजारा समाजासाठी उगवलीच नाहीं

सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 17th, 2009 AT 12:09 AM
सोलापूर - पोलीस रात्री बेरात्री तांड्यावर छापे टाकत आहेत, स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतरही काबाडकष्ट करून सन्मानाने जगू पाहणाऱ्या बंजारा समाजाला गुन्हेगार जमात ठरवत पोलिसांकडून अन्यायी वागणूक मिळत आहे, असे मत दक्षिण सोलापूर तालुका सभापती उमाकांत राठोड यांनी आज येथे व्यक्त केले.
डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. तीत राठोड मार्गदर्शन करीत होते. यावेळी बंजारा क्रांतीदलाचे जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, नगरसेवक भोजराज पवार, मोतीराम राठोड, जगन्नाथ जाधव, चाचा चव्हाण, किसन पवार, अशोक चव्हाण यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
राठोड म्हणाले, "गत महिन्यात 28 तारखेला रात्री पोलिसांनी कोंडी तांडा (ता. उत्तर सोलापूर) येथे छापा टाकला. दिसेल त्याला मारहाण केली.'' पोलिसांच्या भयामुळे तांड्यावर कोणी पुरुषमंडळी आजही नाहीत. ज्यांनी गुन्हे केले त्यांना जरुर पकडा मात्र तांड्यावरील सर्वांनाच कसे गुन्हेगार ठरविता. सापडलेल्या लोकांवर 307 चे गुन्हे दाखल केल्याने जामीन मिळणेही दुरापास्त झाले. हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ मतासाठी बंजारा समाजाला जवळ करायचे, पोलिसांनी अन्याय करीत गुन्हेगारी समाजचा शिक्का मारायचा, नेत्यांनी बघ्याची भूमिका घ्यायची, हे चालणार नाही, असे राठोड म्हणाले.
भोजराज पवार यांनी बंजारा समाजाने संघटितरित्या अन्यायाला विरोध करावा असे सांगून पोलिसांच्या अन्यायी धोरणाचा निषेध केला.
जो समाज बहुसंख्य त्याने अन्याय केला तर अल्पसंख्य समाजाने न्याय कोठे व कसा मागायचा? लमाण तांड्यावरील सगळेच कसे गुन्हेगार असतील? मते मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना समाजावर होत असणारा अन्यायाबाबत काही करावे असे का वाटत नाही? '' असे विविध प्रश्‍न राठोड यांनी यानिमित्त उपस्थित केले.
जिल्हाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी बंजारा समाजाच्या उमेदवारासाठी कॉंग्रेसने जागा सोडल्या पाहिजे असे सांगितले. उमाकांत राठोड, भोजराज पवार, अशोक चव्हाण, अलका राठोड अशा बंजारा समाजातील नेत्यांना कॉंग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली पाहिजे असे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मते व्यक्‍त केली.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik