यवतमाळ: भटक्या विमुक्त जातीची जमाती संख्या आणि त्यांच्या गंभीर समस्या लक्षात घेता बंजारा समाजाला अथवा या जाती- जमातींना विदर्भातून एक तरी जागा काँग्रेसने द्यावी, अशी मागणी बंजारा नेत्यांनी केली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर माजी खासदार हरिभाऊ राठोड होते. त्यांचा भाजप-सेना युतीच्या सेना उमेदवार खासदार भावना गवळींनी ५० हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेस उमेदवाराच्या पराभवापेक्षाही हरिभाऊ राठोड यांचा पराभव ही बाब बंजारा समाजाच्या जिव्हारी लागली आहे, अशी या समाजात मोठय़ा प्रमाणात धारणा झाली आहे. बंजारा समाजाची ही नाराजी काढण्यासाठी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे अनेक नेत्यांनी सांगितले. या संदर्भात खुद्द हरिभाऊ राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही कारंजा मतदारसंघात जागा मागितली आहे, विदर्भात एक आणि मराठवाडय़ात दोन जागा मागितल्या आहेत. बंजारा समाज काँग्रेसच्या पाठीशी आहे. त्यांची मतदार संख्या मोठी आहे. कारंजा तर लोकसभेच्या वेळी १३ हजार मतांचे आधिक्य मिळाले होते. कारंजात काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली तर लढणार काय? असे विचारल्यावर राठोड म्हणाले की, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पक्षासाठी काम करणार आहे. पक्षाने आदेश दिला तर लढणार आहे. |
No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.