सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Tuesday, October 13, 2009

गिरणा धरणाचे पाणी न दिल्यास आंदोलन


सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 13th, 2009 AT 11:06 PM
चाळीसगाव - गिरणा व देशनाला धरणातून काढण्यात आलेल्या पाटचाऱ्यांचा फायदा काही विशिष्ट गावांनाच होत आहे. ज्या गावांत बंजारा समाजाची वस्ती आहे त्या गावांना या दोन्ही धरणांतून पाणी देणे शक्‍य असतानाही त्यांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांचे पाणी बंजारा समाजाची लोकवस्ती असलेल्या गावांना न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देताना श्री. जाधव यांनी सांगितले, की गिरणा व देशनाला (इसापूर) या धरणांच्या तसेच त्यांच्या पाटचाऱ्यांच्या परिसरात माळशेवगे, हातगाव, तळेगाव, अंधारी, शेवरी, ब्राह्मणशेवगे, इसापूर ही बंजारा समाजाच्या वस्तीची गावे आहेत. या गावांमध्ये दरवर्षी विशेषतः उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते. तांड्यावरील लोकांना दूरवर उन्हात भटकंती करून पाणी आणावे लागते. असे असताना धरणाच्या पाण्याचा या सर्व गावांना एक थेंब देखील मिळालेला नाही. केवळ बंजारा समाजाचे लोक या गावांमध्ये अधिक संख्येने मुद्दामहून या गावांना धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे बंजारा क्रांती दलाने हा प्रश्‍न गांभीर्याने विचारात घेतला असून या सर्व गावांना पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे. याबाबत शासनाने दखल न घेतल्यास, गावाच्या हद्दीबाहेर पाणी जाऊ न देण्याचा निर्धारही बंजारा क्रांती दलाने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
चाळीसगाव तालुक्‍यात बंजारा समाजाचे सुमारे 70 तांडे असून समाजाचे एकट्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात 55 हजार मतदार असल्याचे सांगून जाधव यांनी सांगितले, की एवढ्या मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे लोक असूनही आजही समाजाचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे बंजारा समाजाचा आमदार झाला पाहिजे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व जामनेर विधानसभेची जागा मिळावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाने केली आहे. बंजारा समाज कष्टाळू व प्रामाणिक असल्याने या समाजाची नेहमीच गळचेपी होत आली आहे. विशेषतः प्रशासकीय कामांसाठी समाजाची चक्क हेळसांडच होत असते. समाजाच्या अगदी नगण्य मागण्या असतात. बंजारा समाजाच्या अनेकांकडे रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला नाही, तो काढायचा असेल तर तहसील कार्यालयात पैशांची मागणी केली जाते. सातबारा उताऱ्यावर बोजा बसवायचा किंवा उतरायचा असेल तर तलाठी पाचशे रुपये मागतो. त्यामुळे अगोदरच हलाखीचे जीवन जगत असलेल्या बंजारा समाजाची आर्थिक पिळवणूकही होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पंधरा दिवसांत यात सुधारणा आढळून न आल्यास चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात बंजारा क्रांती दलातर्फे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपलाच पाठिंबा
बंजारा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केल्याने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बंजारा क्रांती दल भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीत सहकार्य करणार असल्याचे सांगून जाधव म्हणाले, की महाराष्ट्रात बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात बारा मतदारसंघ विजयाच्या दृष्टीने खात्रीशीर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे या मतदारसंघात आपले उमेदवार उभे राहावेत, यासाठी आपण मागणी केली आहे. मुंडेंसह एकनाथ खडसे यांच्यावर आपला विश्‍वास असल्याने ते या मागणीकडे निश्‍चितपणे लक्ष देतील, अशी आपल्याला खात्री वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस राजेंद्र जाधव, रवी राठोड, शेषराव जाधव, रोहिदास जाधव, नरेंद्र राठोड, डॉ. तुषार राठोड आदी उपस्थित होते.
नाईक यांचे नाव बाजार समितीला द्यावे
हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची एक जुलैला जयंती आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील सर्व बाजार समित्यांना वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशी मागणी बंजारा क्रांती दलाने केली असल्याचे जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात एक जुलैला राज्यातील सर्व तहसीलदारांना बंजारा क्रांती दलातर्फे निवेदन देणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik